ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -भिंगार शाळा हा समाजाशी नाते सांगणारा घटक आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे बाळकडू पाजून उज्वल, स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न साकार केले जावू शकते. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानात शालेय विद्यार्थ्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अहमदनगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विद्याधर पवार यांनी स्वच्छता पखवाडा निमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी केले.
1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत भिंगार छावणी परिषदेमध्ये स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आला होता. स्वच्छतेची शालेय विद्यार्थ्यांना सवय लागावी व त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये स्वच्छता संदेशाचा प्रसार व जनजागृती व्हावी यानिमित्ताने निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ अहमदनगर छावणी परिषद कार्यालयात 15 डिसेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यालयीन अधिक्षिका उज्वला पारनाईक, स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, लेखापाल श्री.सुनिल शिंदे, छावणी परिषद शाळेचे जेष्ठ शिक्षक संजय शिंदे, कलाशिक्षक अरविंद कुडिया,महेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश साके यांनी केले.
0 Comments