Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जि.प अर्थ, पशुवैद्यकीय समितीची ऑनलाइन सभेमध्ये योजनांचा आढावा
 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अर्थ पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन सभेत सर्व योजनांचा आढावा घेऊन 100 टक्के तरतूद उपलब्ध होईल, त्यादृष्टीने सर्व योजनांचे नियोजन करण्यात आले.
यावेळी सभेत समिती सदस्य संध्याताई आठरे, सोनालीताई रोहमारे, शांताबाई खैरे, दिनेश बर्डे, वंदनाताई लोखंडे, रावसाहेब कांगुणे, सुनिताताई दौंड आदींसह सचिव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील कुंभारे आदी सहभागी झाले होते.
सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांची लाभधारकांकडून अर्ज मागण्याचे ठरवले. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 आहे. 
👉अनुसूचित जातीच्या लाभधारकांना दुधाळ जनावरांचे गट पुरवणे. यासाठी एकूण लाभधारक 121 त्यापैकी महिला 66 व दिव्यांग 7 अनुदान 63 हजार 796 रुपये प्रति लाभार्थी.
👉अनुसूचित जातीच्या धारकांकडे जनावरांना 100 टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवणे एकूण लाभार्थी लाभधारक 404 त्यापैकी 121 महिला व 12 दिव्यांग दिव्यांग अनुदान 2,472 प्रती लाभार्थी.
👉आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना दुधाळ जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे एकूण लाभार्थी 12, यापैकी महिला 6 व दिव्यांग एक अनुदान 63, 796 प्रति लाभार्थी.
👉आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना शेळी गटाचा पुरवठा करणे. एकूण 16 लाभार्थी त्यापैकी महिला पाच व दिव्यांग 3 अनुदान 2,472 प्रती लाभार्थी.
👉 आदिवासी क्षेत्राबाहेर क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या लाभधारक कडील जनावरांना पशुखाद्य पुरवठा करणे एकूण लाभार्थी 16 यापैकी महिला 5 व दिव्यांग एक अनुदान 53 हजार 429 प्रति लाभार्थी. 👉आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना दुधाळ जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे एकूण लाभार्थी 18 त्यापैकी महिला 6 व दिव्यांग एक अनुदान 63 हजार 796 प्रति लाभार्थी. 👉आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमाती लाभधारकांना गटाचा पुरवठा करणे एकूण लाभार्थी 16 त्यापैकी महिला 5 व दिव्यांग 1, अनुदान 53 हजार 429 रुपये प्रति लाभार्थी.
👉 आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांकडील जनावरांना पशुखाद्य पुरवठा करणे एकूण लाभार्थी 404 त्यापैकी महिला 121 व दिव्यांग 12 अनुदान 2,472 रुपये प्रति लाभार्थी.

🎯जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर वगळता तालुक्यांमध्ये लंपी त्वचा रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. लंपी रोग हा माशा, डास, गोचीड यांच्यामार्फत पसरतो. जिल्ह्यातील खाजगी पशुवैद्यकीय व खाजगी सेवादाता लसीकरणा वेळी उपचार करताना इंजेक्शन देताना ते बदलत नाही. त्यामुळेही रोग प्रसार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्व खासगी पशुवैद्यकीय व्यवसायिकांनी लंपी त्वचा रोगाच्या जनावरांना उपचार किंवा लसीकरण केल्यानंतर त्यांनी वापरलेल्या सोईची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. एकदा वापरलेले सुई पुन्हा दुसऱ्या जनावरांना वापरू नये, असे आवाहन अर्थ, पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी केले आहे.
Post a Comment

0 Comments