Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मद्यविक्री अनुज्ञप्तीबाबतची माहिती आणि अभिलेख ऑनलाईन करण्याचे कामकाज सुरु ; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांची माहिती

 अभिलेख नष्ट करण्याबाबत समाजमाध्यमात आलेले वृत्त चुकीचे असल्याचा केला खुलासा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -   राज्य उत्पादन शुल्क,विभागातील अनुज्ञप्त्यांचे कामकाज संगणकीकृत करण्याचा भाग म्हणून मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचे मद्यविक्री बाबतची माहिती व इतर कामकाजाचा अभिलेख ऑनलाईन करण्याचे कामकाज सुरु आहे, यात किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचा देखील समावेश आहे. किरकोळ मदय विक्री अनुज्ञप्त्यांचे माहिती ऑनलाईन करण्याकरीता ब-याच वेळी सॉफ्टवेअर, इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणी येत असतात, तसेच सर्वच अनुज्ञप्तीधारक याना त्याचा वापर करण्यास देखील अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे अशा माहितीच्या आधारे एखादा निष्कर्ष काढणे उचीत ठरत नाही. मुळातच सदर संपुर्ण माहिती अंतीम समजण्यात येत नाही. तसेच मा.शासन/ मा. आयुक्त,कार्यालयाने अनुज्ञप्त्यां विषयी माहिती मागितल्यास ती तात्काळ उपलब्ध करुन देण्यांकरीता विभागाचे अधिकारी/कर्मचारी हे अनुज्ञप्ती- धारकांकडून त्यांचे भ्रमणध्वनीवर व व्हाटसअप वर सदर माहितीचे आदान प्रदान करीत असतात.त्यामुळे अभिलेखे नष्ट करण्यासंदर्भात आलेले वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहमदनगर विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी केला आहे.


  अधीक्षक श्री. पाटील यांनी दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की,  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्र.२,श्रीरामपूर यांनी मनमाड रोडवर बाभळेश्वर टोल नाक्याजवळ ता. राहता, जि.अहमदनगर या ठिकाणी गु.र.क्र. ५४/२०२० दिनांक १४-३.२०२० रोजी नोंद केला आहे. सदर गुन्हयात अवैध रित्या स्पिरीट वाहतुक करीत असतांना ट्रक क्रमांक एमएच १८- एए ५५६८ जप्त करुन सदर ट्रक मधील एकूण ७५ प्लॅस्टिक बॅरल मधील एकूण १८,००० ब.लि.स्पिरीट जप्त केलेले आहे. नमुद गुन्हयाच्या तपासात वेळोवेळी १) इंद्रसिंग गुलाब भिल व २) चंदू अर्जुन वानखेडे ३) सुधाकर एकनाथ ससे ४) दादाराम तुकाराम ओहोळ ५) राजकुमार सुदाम ढमढेरे यांना गुन्हयात अटक करुन मा.न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी होती. संदर गुहयाच्या तालात मे.श्री. साईकृपा शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि.हिरडगांव, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथून स्पिरीट अवैध रित्या उचलल्याचे स्पष्ट झाल्याने त्या अनुषंगाने देखील विभागामार्फत नियमानुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित आहे.
   स्पिरीटची अवैध वाहतुक करुन ते अवैध दारु निर्मिती करीता गैरवापर केला जाणार असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयांत शिरपूर जि.धुळे येथील बिजू बागले व योगेश राजपुत व इतर यांचे नांव निषपन्न झाल्याने त्यांना अटक करण्यांची कारवाई तपासी अधिकारी करीत आहेत. सदर गुन्हा सध्या तपासावर असुन यामध्ये जे कोणी दोषी आढळून येतील. त्याचेवर कायदयानुसार कारवाई करण्यात येऊन लवकरात लवकर गुन्हयाचा तपास पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबत विभागाची भूमिका स्पष्ट व्हावी आणि नागरिकांच्या मनात विभागाबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण होऊ नये, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  

Post a Comment

0 Comments