Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर पुरवठा विभागात कार्यालयीन वेळेत अधीक्षक खुर्ची सोडून चक्क टेबलवर बसून गप्पा मारतात..




ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ... 📸👉🥱 वाॅच
अहमदनगर : नगर पुरवठा कार्यालयात अधीक्षक हे आपली खुर्ची सोडून चक्क टेबलवर बसून सहकारी कर्मचा-याबरोबरच कार्यालयीन वेळेतच गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वास्तविक कार्यालयीन वेळेत  वरिष्ठ अधिकारी यांचे असे बेशिस्तीचे वर्तन आयोग्य आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी या संबंधित अधिका-यावर कारवाई करतात की, तंबी देतात ते लवकरच समजले. या व्हिडिओ संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असता संपर्क होऊ शकला नाही.
नगर येथील पुरवठा विभागातील कार्यालयीन वेळेतच आपली खुर्चीवर न बसता, चक्क कार्यालयीन अधीक्षक हे टेबलवर बसून आपल्या कर्मचारी सहका-र्यांबरोबर चर्चा करत आहे. ही बाब एका कार्यालयीन वेळेत अधिक्षकपदी असणा-या वरिष्ठ अधिका-याने कार्यालयीन वेळेत बेशिस्तीचे आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी कार्यालयीन वेळेत आपल्या पदाचा विचार करून कार्यालयात बसणं अथवा उठणे आवश्यक आहे. याबाबत सरकारी प्रशासकीय यंञणेत काम करताना राहणीमानापासून थेट कार्यालयीन वेळेत नागरिकांशी कसे वागवे, अथवा कार्यालयात उठणे,बसणे कसे असावेत, यासंदर्भात काही मार्गदर्शकतत्वे असतीलच. पण या तत्त्वांची नगर पुरवठा विभागात चक्क कार्यालयीन अधीक्षकानेच पायमल्ली केल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यामुळे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय चांगलेच चर्चेचा विषय बनला आहे. 

Post a Comment

0 Comments