Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यास अडचण आल्यास संबंधित स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना नागरिकांनी भेटावे ; जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे आवाहन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - शारीरिक व अपघात गुन्ह्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करण्याची जबाबदारी ही पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदारांची आहे. मालाविरोधाच्या गुन्ह्यामध्ये अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारीमध्ये सदरचा गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा आहे, अथवा तो कसा?. याबाबत संशय असल्यास ललितकुमार विरुद्ध शासन या न्यायनिवाडाचा आधार घेऊन तात्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सांगितले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
वाजवी कारणाशिवाय उशिराने गुन्हे दाखल होणार नाहीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर 2020 अखेर जिल्ह्यात 245 गुन्हे उशिराने दाखल करण्यात आले होते. परंतु नोव्हेंबर 2020 अखेर दैनंदिन गुन्हे अवलोकन केले असता, ऑक्टोबर 2020 च्या तुलनेत उशिराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण 112 ने कमी झाले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याबाबत काही अडचण आल्यास संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक व पोलिस अधिकारी यांना समक्ष कार्यालयात नागरिकांनी भेटावेत, असे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments