Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे खून प्रकरणात बाळासाहेब बोठे याचा सहभाग निष्पन्न ; पाच आरोपी अटक

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- रेखा जरे खून प्रकरणात पत्रकार बाळासाहेब बोठे याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बोठे हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

रेखा जरे खून प्रकरणी यापूर्वीच फिरोज राजू शेख (वय 26 रा. संक्रापूर आंबी ता. राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24 रा. कडीत फत्तेबाद ता. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25 रा. तिसगाव फाटा कोल्हार ता. राहता), सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा. शास्त्रीनगर केडगाव अहमदनगर), ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23, रा. प्रवरानगर ता. राहाता) आदी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात निष्पन्न झालेले बाळासाहेब बोठे हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण रेखा जरे खून प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी अजित पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या पथकास पाच आरोपींना पकडण्यात यश आले आहे.

Post a Comment

0 Comments