ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ
अहमदनगर - भिंगार शहरात अकरा दिवसापासून पाणी सुटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने भिंगार येथील नागरिकांसह बुधवारी (दि.16 डिसेंबर) छावणी परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत शुक्रवारी भिंगार शहरात नळाद्वारे पाणी सोडण्यात आले. पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी तर काही नागरिकांनी सोमवारी भिंगार बंदची हाक दिली होती. मात्र छावणी परिषदेच्या वतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याने सोमवार व मंगळवारचे भिंगार बंद आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे शहर संघटक मतीन सय्यद यांनी दिली.
भिंगार शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आलेला आहे. सोमवार व मंगळवारी दोन दिवस भिंगार बंद असल्याने व्यापार्यांचे नुकसान होणार होते. हे नुकसान होऊ नये यासाठी देखील हा बंद मागे घेण्यात आला आहे. भिंगारकरांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सातत्याने पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे सय्यद यांनी म्हटले आहे.
0 Comments