Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोबाईल चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
राहुरी - मोबाईल चोरी करणारा चोरटा मुद्देमालासह पोलिसांनी अटक केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सडे. ता.राहुरी येथे कामानिमित्त राहात असताना दि. १० डिसेंबरला त्यांनी त्यांचा मोबाईल त्यांचे झोपडीसमोर चाजींगसाठी लावलेला होता. तो ८ हजार रु . किं.चा रेडमी कंपनीचा मोबाईल कोणतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याप्रकरणी गोरख रामा चव्हाण (रा . नांदगांव, जि- नाशिक) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात येथे दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करीत असताना पोनि कटके यांना गोपनिय माहीती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा विजय बर्डे (रा. देवी निमगांव , ता - आष्टी) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची खात्रीशीर माहीत मिळाली. त्यानुसार आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहीती घेवून आरोपी विजय बर्डे याला नेप्ती, ता.नगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वसात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार गोरख अशोक बर्डे (रा. राहूरी खुर्द , ता- राहुरी) असे दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेला ८,००० / -रु . कि . चा रेड - मी कंपणीचा नोट - ९ हा मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे. आरोपी गोरख अशोक बर्डे याचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपी विजय सुदाम बर्डे यास मुद्देमालासह राहुरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलेले असून पुढील कार्यवाही राहुरी पोलिस करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे मॅडम, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ विश्वास बेरड , पोना ज्ञानेश्वर शिंदे , शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे , पोकॉ शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, रोहीत येमूल व चालक पोना कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments