Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय महामार्गाचे नगर ते पाथर्डी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा : मुकुंद गर्जे

 


पाथर्डी तहसील कार्यालयात आंदोलक
 व महामार्गाचे अधिकारी यांची बैठक 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- राष्ट्रीय महामार्गाचे नगर ते पाथर्डी रस्त्याचे काम रखडल्यामुळे या रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला ते काम त्वरित सुरु व्हावे, या मागणीसाठी मुकुंद गर्जे यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आज प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी तहसील कार्यालयात आंदोलक व महामार्गाचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. 
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत लवकरात लवकर काम करण्याची मागणी श्री गर्जे यांनी केली. यावेळी बैठकीस तहसीलदार श्याम वारकड, नायब तहसीलदार पंकज नेवसे,अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, शिवसेनेचे ता अध्यक्ष अंकुश चितळे, मनसेचे संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के ,ता.अध्यक्ष भोरू म्हस्के ,कमलेश गुगळे, संजय मेहेरकर, आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.Post a Comment

0 Comments