Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

औद्योगिक व कृषी हब (क्लस्टर) उभारण्यासाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्नविभागाचे नेतृत्व विकास
 विचार मंथन शिबीर संपन्न
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे - शासनाच्या विविध योजनांचा लाभ वैयक्तिकरीत्या दिला जात असला तरी येणाऱ्या काळात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जातीच्या नागरिकांना सामूहिक रित्या लाभ देऊन औद्योगिक व कृषी हब क्लस्टर निर्माण करण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे त्याचप्रमाणे अधिकार्‍यांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून विद्यार्थ्यांना व समाजाला प्रमाणावर योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजेत असे विचार सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी व्यक्त केले.
दि.19 डिसेंबर रोजी पुणे बार्टी येथे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून विभागाच्या योजनांमध्ये सुधारणा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी विभागातील सर्व प्रादेशिक उपायुक्त व राज्यस्तरीय अधिकारी यांचे नेतृत्व विकास मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सदर कार्यशाळेत सहभागी झाले असता अधिकारी वर्गाला मार्गदर्शन केले.
राज्यात सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून सदर योजना राबविताना अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या कर्तव्यप्रती एकनिष्ठ राहून काम करावे. शासनाने निश्चित केलेला एखादा योजनेसाठीचा खर्च 100% करण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला पाहिजे त्यातून निश्चितच लोकांच्या गरजा पूर्ण होऊन जीवन सुखकर होण्यास मदत होणार आहे. असेही श्री तागडे यांनी यावेळी सांगितले तसेच विभागातील शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम , दिव्यांगांच्या योजना, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा यांचा आढावा घेऊन अधिकारी-कर्मचारी यांच्या देखील प्रश्न सोडवले जातील सेवाजेष्ठता असेल किंवा पदोन्नतीचा प्रश्न असेल त्यावर देखील शासन लवकरात लवकर निर्णय घेईल, व अशाप्रकारे नेतृत्व विकास विचार मंथन शिबिरातून कार्याची निश्चितच नवी दिशा मिळेल अशी आशा ही श्री श्याम तागडे यांनी शेवटी व्यक्त केली.
नेतृत्व विकास विचार मंथन शिबीर अंतर्गत समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी वससतीगृहातील विद्यार्थ्यांचा भोजनाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता राज्यातील वसतिगृहांमध्ये लवकरच सेंट्रल किचन योजना राबविण्याबरोबरच अनुसूचित जातीच्या लोकांकरिता राज्यात औद्योगिक व कृषी हब (क्लस्टर) विकसित करण्यासाठी प्रयत्न असल्याची माहिती यावेळी दिली. योजना राबविताना अधिकारी वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाचे असते त्यामुळे त्या योजनेचे यश अपयशाची जबाबदारी स्वाभाविकच अधिकारी वर्गावर येते. त्यामुळे अधिकारी वर्गाने आपल्या विभागात अधिक सक्षम पणे कार्यरत राहणे अत्यंत गरजेचे आहे,साठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तसेच शासनाने एखाद्या योजनेसाठी दिलेला पैसा खर्च करताना काटेकोरपणे व वित्तीय अधिकारानुसार खर्च केला पाहिजे कारण तो सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेला असतो याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. असेही श्री नारनवरे यांनी सांगून सर्व कार्यालयांना पूर्ण क्षमतेने अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यामुळे प्रशासकीय कामकाजात गतीमानता येण्यास मदत होईल. त्यातून योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचून तळागाळातील मागासवर्गीय समाज सशक्त होण्यास मदत होणार असल्याचे ही श्री नारनवरे यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे शिक्षणाच्या शिष्यवृत्ती सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महाविद्यालयस
तरावर संपर्क अभियानांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी सांगितले. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे एखाद्याने लाभ घेतला असल्यास व तसे आढळून आल्यास त्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नसून अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याचे त्यांनी यावेळेस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले व त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या करावेत यावेळी दिल्या.
समाज कल्याण विभागात प्रथमच अशाप्रकारे नेतृत्व विकास विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले विचारमंथन शिबिरातून निश्चितच विभागाच्‍या योजना राबविण्यात त्याची परिणामकारकता दिसेल असा सामूहिक सूर अधिकारी वर्गाने यावेळी व्यक्त करून आयुक्त श्री नारनवरे यांना धन्यवाद दिले.
समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार पार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता थोर/राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन यावेळी केले.  
उद्घाटन प्रसंगी दिव्यांग विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी देखील अधिकारी यांना मार्गदर्शन करताना अनेक देशांच्या व तेथील व्यक्तींच्या प्रश्नांबाबत दाखला देत देशात देखील वंचित या शब्दाची व्याख्या करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून समानता प्रस्थापित होण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून अशा विचार मंथन शिबिरातून त्याचा निश्चितच उपयोग होईल असे त्यांनी सांगितले.यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. श्रेस्था बेपारी यांनी ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या विचार मंथन शिबिरात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, दलित वस्ती सुधार योजना, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, नाविन्यपूर्ण योजना, जिल्हा वार्षिक योजना, शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, मनी मार्जिन , मिनी ट्रॅक्टर, स्वाभिमान व सबळीकरण योजना, उद्योजकता व कौशल्य विकास , व कार्यालयीन कार्यपद्धती याबाबत राज्यातील प्रादेशिक उपायुक्त यांनी सादरीकरण करून त्यात करावयाचे काही सूचना, बदल सुचित केले.
यावेळी सहआयुक्त भारत केंद्रे सह आयुक्त वैशाली शिंदे उपायुक्त प्रशांत चव्हाण, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त पुणे बाळासाहेब सोळंकी यांच्यासह मुख्यालयातील सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व राज्यातील सर्व विभागांचे प्रादेशिक उपायुक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments