Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय शेतकरी युनीयनच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब ढाकणे

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारी व संपूर्ण भारत देश कार्यक्षेत्र आसणारी सामाजिक संघटना राष्ट्रीय शेतकरी युनीयन अ. नगर जिल्हाध्यक्षपदाची प्रकीया गेली दोन महिन्यापासुन चालु होती. या पदासाठी ३० जण इच्छक होते. अखेर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळकृष्ण दिघोळे यांनी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढाकणे यांची राष्ट्रीय शेतकरी युनीयनच्या अहमदनगर जिल्हाध्यपदी निवड केली. तसे निवडीचे पत्र राष्ट्रीय शेतकरी दिनानिमीत्त ढाकणे यांना प्राप्त झाले.

ढाकणे हे शेतकऱ्यांसाठी काम करीत आसल्याबद्दल पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या निवडीबद्दल जल्लोष व्यक्त केला व शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या माणसाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळकृष्ण दिघोळे यांचे आभार मानले.
ढाकणे यांच्या निवडीचे माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी, खा.डॉ. सुजय विखे, आ. मोनिकाताई राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपा भटकेविमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल कारखेले, नगराध्यक्ष डॉ.मृत्युजंय गर्जे, भाजपाचे जेष्ठ नेते अशोकराव गर्जे , भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव चोरमुले, उ्योजक बाबासाहेब ढाकणे, अर्जुनराव शिरसाट, सोमनाथ खेडकर, नवनाथ खेडकर, हारी वायकर, गुलाबभाई शेख, मुनीर पटेल नवनाथ वाघ,व पागोरी पिंपळगांव व परिसरातील शेतकरी चळवळीतील शेतकरी बांधवांनी ढाकणे यांच्या निवडीचे स्वागत करुन अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments