Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे खून प्रकरण ; फिरोज शेख, ज्ञानेश्‍वर शिंदे यांना न्यायालयीन कोठडी तर सागर भिंगारदिवे, ॠषीकेश पवार, आदित्य चोळके यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - रेखा जरे खून प्रकरणी अटक असणारे फिरोज राजू शेख व ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे यांना न्यायालयीन कोठडी तर सागर उत्तम भिंगारदिवे व ॠषीकेश उर्फ टम्या वसंत पवार आदित्य सुधाकर चोळके यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कनिष्ठस्तर दिवानी न्यायाधिश उमा बोऱ्हाडे यांनी दिले.
पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने सर्व आरोपींना दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले होते. प्रारंभी पाचही आरोपींची ओळख परेड करण्यात आली. यानंतर तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी दि.२४ नोहेंबर रोजी मयत रेखा जरे यांचा अपघात घडवून आणण्यात येणार होता. त्यातील आरोपी तसेच त्या घटनेत वापरण्यात येणारा ४०७ टेम्पो हस्तगत करायचा आहे. रेखा जरे खून प्रकरणीतील सुत्रधार बाळ बोठे याने खून करण्यासाठी दिलेल्या सुपारीची उर्वरित रक्कम हस्तगत करायची आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आजूनही साथीदार असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची विचापूस करणे आवश्यक आहे. विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेजर हस्तगत करण्यात आले असून त्याअनुषंगाने सखोल चौकशी करायची असल्याने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तिघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयास केली. न्यायालयाने पाटील यांनी विनंती मान्य करून राजू शेख व ज्ञानेश्‍वर शिंदे, यांना न्यायालयीन तर सागर भिंगारदिवे व ॠषीकेश पवार आणि आदित्य चोळके यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आरोपी फिरोज शेख आणि ज्ञानेश्‍वर शिंदे, यांचा पोलिस कोठडीचा अधिकार शाबूत ठेउन ओळख परेडसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. ती न्यायायाने मान्य केली. सोमवारी न्यायालयात पाचही आरोपींच्या वतीने वकील उपस्थित होते. चोळके या आरोपीसाठी स्वतंत्र वकील उपस्थित होता.Post a Comment

0 Comments