Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अशोक झोटींग यांच्या हस्ते यांचा सत्कार

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे यांची नियुक्ती संघाचे अध्यक्ष डॉ.राहुल जैन-बागमार व प्रमुख मार्गदर्शक अशोकराव सोनवणे यांनी केली आहे.
बाबा ढाकणे यांची महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार तथा मराठवाडा केसरीचे निवासी संपादक अशोकराव झोटींग यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दै. राज आनंदचे संपादक विठ्ठल शिंदे, कार्यकारी संपादक प्रकाश साळवे, युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, अंधश्रद्धा निर्मूलनचे शहर अध्यक्ष नागेश शिंदे,रिपई राज्य समन्वयक आनंद सुर्यवंशी, नगर शहर डिटीपी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब नागुल, सार्थक वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. मेटे महाराज म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ आज आर्थिक संकटात सापडला आहे. लोकांच्या समस्या, प्रश्न सोडवणारा घटक म्हणून परिचीत असलेला पत्रकार सध्या स्वतःच्या आर्थिक अडचवणी सोडवण्यात अपयशी होत आहे. अशावेळी सर्व पत्रकार बांधवांनी एका झेंड्याखाली एकत्र येऊन संघटीत होणे गरजेचे आहे.  हे काम महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या माध्यमातून बाबासाहेब ढाकणे करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना ढाकणे म्हणाले की, आज कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्राप्रमाणे वृत्तपत्रावर देखील परिणाम झाला आहे. आर्थिक संकटामुळे अनेक दैनिक अवृत्या बंद झाल्यामुळे अनेक पत्रकारांवर रोजगारीची प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात सर्व स्थरातील पत्रकारांनी एकत्र येऊन शहरी व ग्रामिण पत्रकारांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण शासकीय दरबारी प्रयत्न करणार आहोत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे ढाकणे म्हणाले.  

Post a Comment

0 Comments