Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदाकडे लक्ष !

 


'स्वत:च ठेवा झाकून, दुस-याचे पाहावे वाकून,' अशी संस्थेची अवस्था 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर शहरातील सर्व पत्रकारांना एकाच छताखाली येण्यासाठी व सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन  'अहमदनगर प्रेस क्लब' ही संस्था स्थापन केली. या संस्थेवर नियमाप्रमाणे निवडणुका झाल्या. परंतु काही वर्षापासून या सर्वच नियमांना तिलांजली देत काही अपवाद पञकारांनी काही मोजक्या पञकारांना सोबत घेत स्वतः अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष असल्याचे घोषित केले. पण आज या नगर शहरातील पत्रकारांसाठीच्या संस्थेवर अधिकृत अध्यक्ष असण्यासाठी नियमाप्रमाणे निवडणूक होणे क्रमप्राप्त आहे. त्यादृष्टीने नगर शहरातील सर्व पत्रकारांचे म्हणणे आहे की, नियमाप्रमाणेच निवडणूक व्हावी अशी अपेक्षा सर्व पत्रकारांमध्ये आहे.

अहमदनगर संस्थेमध्ये यापूर्वी झालेल्या अनगोंदी काराभाराबाबत ज्येष्ठ पत्रकार बाबा जाधव यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याबाबत निकाल लागणे बाकी आहे असो, यानंतरही निवडणूक होणे आवश्यक होते. पण केवळ काही अपवाद पत्रकारांनी दादागिरी केल्यासारखेच करून अहमदनगर प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी बसल्याचे पत्रकारांमध्ये चर्चा आहे. काहींनी मांडले की, स्वत:च ठेवा झाकून, दुस-याचे पाहावे वाकून, अशी परिस्थिती अहमदनगर प्रेस क्लब संस्थेची झाली आहे. यामुळेच या अहमदनगर प्रेस क्लबची अधिकृत निवडणूक व्हावी, अशी माफक अपेक्षा सर्व नगर शहरातील पत्रकारांमध्ये मांडली जात आहे.
Post a Comment

0 Comments