ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे बबनराव शेळके मित्र मंडळ आणि पुण्याचे बुद्रानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने २३५ वे नेञतपासणी शिबीर पार पडले.
शिबिराचे उद्घाटन माजी उपसरपंच शरद पवार याच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप कांकरिया होते. अनिल शेलार, ज्ञानेश्वर ठोंबरे , भास्कर खडके, दत्तात्रय कोकाटे, दत्तात्रेय शेळके उपस्थित होते.
यावेळी उद्घाटन प्रसंगी पवार म्हणाले वृद्धांची सेवा हीच ईश्वर सेवा असून, शेळके यांनी हाती घेतलेले सेवा ही युवकांना प्रेरणादायी ठरणार असून त्यांनी आत्तापर्यंत 14 हजार पेक्षा जास्त रुग्णांना दृष्टी देण्याचे महान कार्य केले असून त्यांच्या कार्यास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा त्यांनी असेच सामाजिक काम करत राहावे .
त्याचबरोबर दिलीप कांकरीया म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अनेक जन फक्त स्वतःच्या नावासाठी वर्षातून दोन-चार शिबीरे किंवा कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांचा एवढा मोठा गाजावाजा करतात त्यासाठी खूप काही केलं म्हणून प्रत्यक्षात जनतेची मनापासून सेवा करणारी वेगळेच असतात आणि त्यांच्यापैकी सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र वृद्धांची सेवा करणारे असे बबनराव शेळके आहेत.
या शिबिराचा ८४ नेत्र रुग्णांनी लाभ घेतला असून यातील 66नेत्र रुग्णांवर पुण्याच्या के के आय हॉस्पिटलमध्ये नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मनीषा कोरडे, अमोल,भिंगारदिवे, आबासाहेब वाडेकर, संभाजी खडके, अशोक जाधव, प्रकाश तनपुरे, धोंडीराम आगलावे यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
0 Comments