Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्व.रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी अहमदनगरला कँडल मार्च

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष स्व. रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी (दि.३०) सायंकाळी 5.30 वाजता अहमदनगरला कँडल मार्च काढण्यात येणार आहे. 
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील पसार आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे अजूनही सापडलेला नाही. त्याच्या शोध घेत आहेत.
जरे यांच्या कुटुंबियांनीच (स्व.) जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी ३० डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नगरमधून कँडल मार्च आयोजित केला आहे. या दिवशी सायंकाळी कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा कँडल मार्च नेला जाणार आहे. यात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून (स्व.) जरे यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन जरे कुटुंबियांनी केले आहे.
मागील ३० नोव्हेंबरला रात्री ८च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची निर्घृण हत्या करण्याची घटना घडली आहे. या घटनेला येत्या ३० डिसेंबरला एक महिना होणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपी पकडले असले तरी या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे या खून प्रकरणाचा तपास जवळपास ठप्प झाला आहे. जरे यांच्या खुनाचे नेमके कारण काय, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बोठेचे सहकारी तसेच त्याच्या मित्रपरिवारातील काहींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले असले तरी या मंडळींनी दिलेल्या माहितीची रुजवात बोठे हा सापडल्यावरच होणार आहे. पण तो सापडत नसल्याने व आता त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला असल्याने पोलिसांसमोर त्याचा शोध आव्हानात्मक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता जरे कुटुंबियांचाही संयम संपत चालल्याचे दिसू लागले आहे. (स्व.) जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही राजकीय वा सामाजिक संघटना पुढे येत नसल्याने अखेर जरे कुटुंबियांनीच पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर व पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना पकडल्यानंतर काही दिवस जरे यांच्या घराच्या परिसरात काही संशयास्पद व्यक्तींचे दुचाकीवरून येणे-जाणे वाढले होते. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिस संरक्षणाची मागणी केल्यावर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांना संरक्षण पुरवले. मनसे, रिपब्लिकन पक्ष व समाजवादी पक्षाच्या काहींनी या कुटुंबाची भेट घेऊन आवश्यक मदतीची ग्वाही दिली. याच संघटनांसह येथील ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश लगड यांनीच आरोपी पत्रकार बाळ बोठेविरोधात कठोर कारवाईची जाहीर मागणी केली आहे. 

Post a Comment

0 Comments