Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर तालुका ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय येथून शासकीय सुटी वगळता २३ ते ३० डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करता येणारऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला आहे. अहमदनगर तालुक्‍यात 59 ग्रामपंचायतीमध्‍ये एकुण 216 प्रभागातुन 583 सदस्‍य निवडून द्यावयाचे आहेत. दि. 14 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द केली असुन एकुण पुरूष 63 हजार 898 व महिला 57 हजार 376 व इतर 2 असे एकुण 1 लाख 21 हजार 276 मतदारांचा  मतदार यादीत समावेश केला असुन अंदाजे 239 मतदान केंद्र असणार आहेत.
   इच्‍छुक उमेदवारांनी आयोगाचे निर्देशानुसार http://panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन पध्‍दतीने फॉर्म भरणे आवश्‍यक असुन मागास प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जातपडताळणी पोहोच व हमीपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.
    आयोगाचे निर्देशानुसार दि. 15 डिसेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन सदरची निवडणूक प्रक्रिया ही जिल्‍हा सैनिक लॉन, अहमदनगर जिल्‍हाधिकारी कार्यालयाजवळ अहमदनगर येथे स्विकारणेत येणार होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्‍तव संपुर्ण निवडणूक प्रक्रिया ही त‍हसिल कार्यालय, अहमदनगर, जिल्‍हा मध्‍य्वर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्‍ही. सेंटर समोर, अहमदनगर येथे होणार आहे. उमेदवारांना दि. 23 ते 30 डिसेंबर 2020 रोजी (शासकीय सुट्ट्या वगळुन) नामनिर्देशनपत्र निवडणुक निर्णय अधिकारी यांचे समक्ष सादर करण्‍यात येतील. दाखल नामनिर्देशनपत्राची दि. 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपासुन ते छाननी संपेपर्यंत छाननी करण्‍यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दि. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेण्‍यासाठी मुदत असेल व तद्नंतर निवडणुक निर्णय अधिकारी हे अंतिम उमेदवारांस चिन्‍हवाटप करतील. दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान घेण्‍यात येणार असुन दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती तहसीलदार, नगर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments