Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरीचा मोबाईल घेणारच जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कोपरगाव - तालुक्यातील सवंत्सर या ठिकाणीहून चोरीचा मोबाईल घेणारच जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दिनेश दादासाहेब नेहे (वय २१, रा.सवंत्सर ता. कोपरगाव) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मोबाईल चोरीप्रकरणी दि.29 नोव्हेंबरला शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मोबाईल हा दिनेश दादासाहेब नेहे (रा. सवंत्सर ता. कोपरगाव) याचेकडे असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोनि कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. सदर ठिकाणी जाऊन आरोपी दिनेश दादासाहेब नेहे (रा. सवंत्सर ता.कोपरगाव) यास ताब्यात घेतले. सदर गुन्हयातील मोबाईल बाबत विचारपूस करता त्याने गुन्ह्यातील १० हजार रु किमतीचा सॅमसगं ए ५१ काढून दिला. मोबाईल हा शुभम शायरी चव्हाण (रा. शिंगणापुर रेल्वे स्टेशन, ता कोपरगाव जि.अ.नगर) ( फरार ) याने चोरी केला आहे. त्याचेकडून विकत घेतल्याचे सांगितले. सदर तो चोरीचा मोबाईल हा दोन पंचासमक्ष जप्त केला. आरोपी नेहे याला मुद्देमालासह शिर्डी पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास शिडी पो.स्टे करीत आहे. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पो.नि. कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पथकातील पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोना. शंकर चौधरी, रविकरण सोनटक्के, सचिन आडबल, संतोष लोटे, दिपक शिंदे, पोकाॅ रोहीत येमुल, चापोहेकॉ उमांकात गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments