Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उच्च शिक्षणात मधुरा चव्हाण हिचे नेत्रदिपक यश : सुभाष गुंदेचाटेक्सास विद्यापीठातुन मिळवली पीच डी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर : आज शिक्षण क्षेत्रात मुलींची कामगिरी अव्वल ठरत आहे. उच्च शिक्षणात प्राविण्य मिळवण्यात देखील मुली  पुढे आहेत. अमेरिकेतील टेक्सास येथील ए अॅण्ड एम विद्यापिठातुन स्ट्रक्चरल इंजिनिअरींग या अडीच वर्षांच्या अभ्यासक्रमातून कु. मधुरा चव्हाण हिने पीएच डी प्राप्त करून मिळवलेले यश नेत्रदिपक असून समाजासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केले.
एमआयडीसी येथील उद्योजक व मे चव्हाण अॅण्ड सन्स, संजय टाईल्सचे संचालक संजय चव्हाण व  सौ क्षितीजा चव्हाण यांची कन्या मधुरा चव्हाण हिने अमेरिकेतील टेक्सास येथील ए अॅण्ड एम विद्यापीठात स्ट्रक्चरल इंजिनीअरींग विषयात पीच डी मिळवून यश संपादन केल्याबद्दल शहर सहकारी बँकेच्यावतीने कु. मधुरा हिचा सत्कार करण्यात आला त्यावेळी श्री गुंदेचा बोलत होते. शहर बँकेने आजवर उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक कर्जातुन अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले ही आमच्या साठी समाधानाची बाब असल्याचे यावेळी श्री गुंदेचा यांनी आवर्जुन सांगितले.
 कु. मधुरा हिने एम टेक ( एनआयटी ) सूरत येथून १० पैकी ९.५० ग्रेडिंग पूर्ण केले होते. 
टेक्सास विद्यापीठातुन अशा प्रकारची पीएचडी मिळवणे ही नगर जिल्हयासाठीच नव्हे तर देशासाठी गौरवास्पद बाब आहे, कु. मधुरा हिने संपादन केलेल्या यशामुळे तीचे भविष्य उज्वल असून  ती देशपातळीवर आणखी कर्तृत्व गाजवेल असा विश्वास उपाध्यक्ष सुजित बेडेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना कु मधुरा म्हणाली की, माझ्या यशात शहर बँकेचे मोलाचे योगदान आहे. बँकेने मला अमेरिकेतील टेक्सास येथील विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले, त्यामुळेच मला हे यश प्राप्त होऊ शकले, त्यामुळे मी बँकेची आभारी आहे.
 बँकेच्या सेवक प्रतिनीधीपदी निवड झाल्याबद्दल संतोष मखरे यांचे संचालक मंडळाच्यावतीने अभिनंदन करण्यात आला.
यावेळी संचालक अशोक कानडे, संजय घुले, संजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वीर खान, जॉईंट मुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय. कुलकर्णी, विशेष कार्य. अधिकारी जवाहर कटारिया, सेवक प्रतिनीधी संजय मुळे, संतोष मखरे, सुनिल निंबाळकर, प्रकाश वैरागर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments