Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपणलोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षशील व्यक्तीमत्वातून कार्यकर्त्यांना प्रेरणा : नगरसेवक रामदास आंधळे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर 

अहमदनगर : लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे हे एक संघर्षशील व झंझावाती नेतृत्व होते. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेत सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलने केली. राजकारणात त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. आज मुंडेसाहेब आपल्यात नाहीत परंतू त्यांच्या संघर्षशील व्यक्तीमत्वाची छाप आजही आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनावर आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही जनसेवेचा वारसा चालवीत आहोत, असे प्रतिपादन भाजपा नगरसेवक रामदास आंधळे यांनी केले.लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पारीजात चौक ते बीएसएनएल कार्यालय रस्त्याच्या दुतर्फा १० फुट उंचीची झाडे लावण्यात आली, त्यावेळी श्री आंधळे बोलत होते.
श्री आंधळे पुढे म्हणाले की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे लोकनेते स्व मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणार आहोत.
याच बरोबर नगरसेवक पदाच्या माध्यमातून विकासकामांबरोबरच  सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबविणार असल्याचे श्री आंधळे यांनी सांगितले.
यावेळी लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका संगिता खरमाळे, मेजर शिवाजी पालवे, सुधिर पोटे, मदन पालवे, राहूल आंधळे, कैलास गर्जे, दिपक कावळे, शिरीष जानवे, अभिजीत चिप्पा, ऋग्वेद गंधे, संतोष हारेर, सुरेश सानप, अॅड. पोपट पालवे, वैभव आव्हाड, हर्षल बांगर, स्वप्नील नांगरे, आनंद नाकाडे, आकाश सोनवणे आदी उपस्थित होते.
मेजर शिवाजी पालवे म्हणाले की,  वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी यासाठी मी स्वतः पाचशे वडाची झाडे लावुन त्यांचे दोन वर्षांपासून संगोपन करत आहे. त्याचे एक वेगळेच समाधान मिळते.

Post a Comment

0 Comments