Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी तालुक्यात शेतामधील ६ लाख रुपयांच्या गांजाची झाडे जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- पाथर्डी तालुक्यातल्या एकनाथवाडी शिवारात असलेल्या शेतात ६ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत विष्णू अनिल डोंगरे, बाळासाहेब भानुदास खेडकर, शहादेव रावसाहेब खेडकर (सर्व रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी) या तिघांच्या शेतजमिनीतून ६२ किलो ३४६ ग्रॅम वजनाची ६ लाख २३ हजार ४५० रुपये किंमतीचे गांजाचे झाड, त्या झाडाच्या वाळलेल्या फांद्या आणि पाला असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक फौजदार सोन्याबापू शिंदे, पोलीस हेडकाँस्टेबल बाळासाहेब मुळीक, पो. हे. काँ. विश्वास बेरड, पो. हे. काँ. संदीप घोडके, पोना शंकर चौधरी  आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
Post a Comment

0 Comments