ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
परळी -जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल यांच्या रिक्त जागेची भरती तातडीने करावी, असे निवेदन पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना माऊली मुंडे पाटील यांनी आज दिले. बीड येथे आढावा बैठकीसाठी ना.धनंजय मुुंडे आले असता त्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
बीड जिल्ह्यात पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्या अनेक जागा रिक्त असून त्याची भरती तातडीने करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांना आज पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष माऊली मुंडे यांनी निवेदन दिले. बीड येथे बैठकीसाठी पालकमंत्री ना.मुंडे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी पंढरीनाथ उगले, शिवाजी नागरगोजे, झुंबर पाटील, सुरेश देशमुख, महादेव पौळ आदींसह अनेक पोलीस पाटील उपस्थित होते.
संकलन : महादेव गिते
0 Comments