Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जप्त करण्यात आलेल्या जमीन जप्तीतून मुक्त करणे आणि कसूर करणार्‍या व्यक्तीकडे परत करण्यासाठीच्या अधीनियमात सुधारणा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 182 (4) अन्वये जप्त करणेत आलेली जमीन जप्तीतुन मुक्‍त करण्यासाठी व कसूर करणा-या व्यक्तीकडे परत करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांनी कळविले आहे.  या अधीनियमात सुधारणा करुन आता पोटकलम (5) अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे जप्त केलेली आणि जिल्हाधिकारी यांच्या व्यवस्थापनाखाली आणलेली स्थावर मालमत्ता परत करणे यात नव्या पोटकलमानुसार आता आकारावयाची दंडाची रक्कम आणि खंडाच्या रकमेमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 182 (4) अन्वये जप्त करण्यात आलेली जमीन जप्तीतून मुक्त करण्यासाठी व कसूर करणार्‍या व्यक्तीकड़े परत करण्यासाठी अशा जप्तीच्या दिनांकापासुन बारा वर्षाच्या आत कोणत्याही वेळी, कसूर करणा-या व्यक्‍तीने जिल्हाथिकारी यांच्याकडे अर्ज केल्यास, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे 182 (4)(अ) नुसार ज्यावेळी असा अर्ज केला असेल त्यावेळी थकबाकीची फेड करण्यात आली आहे असे आढळुन आले किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे 182 (4)(ब) नुसार तिच्याकडुन अद्याप येणे असलेली बाकी असल्यास, जर कसूर करणारी व्यक्‍ती ती देण्यास तयार असेल आणि जिल्हाधिकारी त्याबाबतीत विनिर्दिष्ट करील अशा मुदतीत ती रक्‍कम ती देईल तर अशा, अशा रितीने जप्त केलेली जमीन, जप्तीतुन मुक्‍त करणेत येईल व कसूर करणा-या व्यक्‍तीस परत देण्यात येईल अशी तरतूद आहे.
     या प्रकरणी महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दि.22/08/2016 रोजी प्रसिध्द करणेत येऊन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (तिसरी सुधारणा) अधिनियम 2016 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 182 मध्ये सुधारणा करणेत येऊन पोटकलम (5) जादा दाखल करणेत आलेला आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 182 मधील तरतूर्दीच्या अंमलबजावणीकरीता मुळ मालकांना अथवा त्यांचे कायदेशीर वारसांना जमीन परत करणेकरीता जमिनीचा संभाव्य वापर विचारात घेऊन दंड व खंड याची रक्‍कम विहित करण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब मध्ये दि.01 जानेवारी 2018 रोजी अधिसुचना प्रसिध्द करणेत येऊन महाराष्ट्र जमीन महसूल (जप्त केलेली आणि जिल्हाधिकारी यांच्या व्यवस्थापनाखाली आणलेली स्थावर मालमत्ता परत करणे) नियम, 2017 अंमलात आलेला आहे. त्यानुसार म.ज.म.अधिनियम,1966 चे कलम 182 पोट कलम (5) नुसार आकारावयाची दंडाची व खंडाच्या रकमेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे.
  वार्षिक खंडाची रक्‍कमः- कसुर करणारी व्यक्‍ती अथवा त्यांच्या वारसाकडुन जप्त करण्यात आलेली जमीन, अशी कसूर करणारी व्यक्‍ती अथवा त्यांच्या वारसास परत करताना कलम 182 (5) खंड (2) अन्वये खालीलप्रमाणे वार्षिक खंड आकारण्यात यावा.
 (एक) संबधित जमिनीचा शेती प्रयोजनासाठीचा वापर असल्यास, अशा जमिनीच्या बाजारमुल्याच्या 0.1 टक्के इतका खंड

(दोन) संबधित जमिनीचा निवासी वापर असल्यास, अशा जमिनीच्या बाजारमूल्याच्या 0.2 टक्‌के इतका खंड

(तीन) संबधित जमिनीचा निवासी प्रयोजनाव्यतिरिक्त कोणताही अकृषिक वापर असल्यास, अशा जमिनीच्या बाजारमुल्याच्या 0.3 टक्के इतका खंड

दंडाची रक्‍्कमः- कसुर करणारी व्यक्‍ती अथवा त्यांच्या वारसाकडुन जप्त करण्यात आलेली जमीन, अशी कसूर करणारी व्यक्‍ती अथवा त्यांच्या वारसास प्रत्यार्पित करतांना कलम 182 (5) खंड (3) अन्वये खालीलप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात यावी.(एक) संबंधित जमीन ग्रामीण क्षेत्रात, किंवा नगरपंचायत क्षेत्रात किंवा प्रार्प अथवा मंजुर प्रादेशिक योजना क्षेत्रात,शेती किंवा ना-विकास वापर विभागात असल्यास, अशा बाजारमुल्यांच्या 20% रक्‍कम

(दोन) संबंधित जमीन प्रारुप अथवा मंजुर प्रादेशिक योजना क्षेत्रात, अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात असल्यास, अशा जमिनीच्या बाजारमुल्याच्या 35% रक्‍कम

(तीन) संबधित जमीन महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात, प्रारप अथवा मंजुर विकास आराखडा क्षेत्रात असल्यास, अशा जमिनीच्या बाजारमुल्याच्या 50 % रक्‍कम
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 185 अन्वये जप्त करुन जिल्हाधिका-यांच्या व्यवस्थापनाखाली घेतत्रेल्या जमिनीबाबत वरील्रप्रमाणे दंडाची रक्कम व खंडाची रक्कम सरकारजमा केलेनंतर जप्त केलेली जमीन कसूर करणा-या व्यक्‍ती अथवा त्यांचे कायदेशीर वारसांना परत करणेत येईल. तसेच उक्त नमूद अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कत्रम 182 मधील तरतूदी आकृष्ट होत नसलेल्या प्रकरणांत "आकारीपड" असा उल्लेख अधिकार अभिलेखात असल्यास, अशा जमीनीच्या बाबतीतील प्रकरणात उपरोक्त तरतूदीचा वापर करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments