Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धारदार शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - धारदार शस्त्राचा धाक दाखवून व्यापारास लुटणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. सोमनाथ रघुनाथ गोपाळ (वय 28 रा. वाघवस्ती शिर्डी ता. राहता), गणेश जालिंदर चव्हाण (रा. मोहनीराजनगर, कोपरगांव), राहुल प्रभाकर गोडगे (रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर), रवींद्र अर्जुन तुपे (रा. वाघवस्ती शिर्डी ता. राहता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.      याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव येथील किशोर वाईन्स दुकानातून बॅगमध्ये रोख रक्कम घेऊन अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चार इसमांनी गाडीला लाथ मारून खाली पाडले. या दरम्यान धारदार शस्त्राचा धाक दाखवून जवळील रोख रक्कम टॅब व मोबाईल असा एकूण 4 लाख 98 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. याप्रकरणी दिलीप शंकर गौड (रा. निवारा कोपरगाव) या व्यापार्‍याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना सदरचा गुन्हा सोमनाथ गोपाळ यांनी केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. या माहितीआधारे श्री कटके यांनी त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने सोमनाथ गोपाळ याला शिर्डी येथून ताब्यात घेतले. गोपाळ याला पोलीस खाक्या दाखविताच गुन्हा हा त्याच्या साथीदार गणेश चव्हाण, राहुल गोडगे, रवींद्र तुपे, सिद्धार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांनी मिळून केल्याची कबुली दिली. त्यानुसार सदर आरोपींचा शोध घेऊन यात गणेश चव्हाण, राहुल गोडगे, रवींद्र तुपे यांना वेगवेगळ्या ठिकाणीहून ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला रोख रक्कमेपैकी 86 हजार 500 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राहुल घोडके व सोमनाथ गोपाळ हे दोघे आरोपी ही सराईत गुन्हेगार आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि शिशिकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, सफौ मोहन गाजरे, पोहेकाॅ बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोना शंकर चौधरी, रवी सोनटक्के, संतोष लोढे, दीपक शिंदे, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, राहुल सोळुंके, रणजित जाधव, रवींद्र घुंगासे, प्रकाश वाघ, योगेश सातपुते, सागर सुलाने, विजय धनेधर, मयूर गायकवाड, संदीप चव्हाण, जालिंदर माने, चापोहेकाॅ बबन बेरड, चापोना उमाकांत गावडे, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment

0 Comments