Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विराज कॉलनीतील रस्ता काँक्रीटीकरण कामांचे लोकार्पणविकास कामांमुळे शहराचा 
चेहरामोहरा बदलत आहे : आ. संग्राम जगताप 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात व उपनगरांत सुरु असलेल्या विकासकामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. नागरिकांनी देखील विकास कामांमध्ये सहकार्य करावे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
तारकपूर परिसरातील विराज कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला त्यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विकास कामांमध्ये नागरिकांची सकारात्मक भूमिका आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून शहराचे ब्रँडींग केले पाहीजे. तारकपूर भागात हॉस्पिटल्सची संख्या वाढत आहे. जिल्ह्याभरातून लोक उपचारासाठी येथे येत असतात. त्यामुळे या परिसरात प्राधान्याने नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. 
यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, उद्योजक अमोल गाडे, सुनिल काळे, नवनाथ धुमाळ, डॉ. अर्जुन शिरसाठ, डॉ. दिलीप बागल, डॉ. निलीमा बागल, डॉ. संदीप धुमाळ, डॉ. संतोष चेडे, डॉ. रेश्मा चेडे डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. सचिन होडशीळ, मधुकर जाधव, राहुल जाधव, सुनंदा धुमाळ, सुचेता शिरसाठ, डॉ. अशोक कराड, डॉ. महेश बिहाणी, डॉ. दिनेश बिहाणी, श्रीकृष्ण सानप आदी उपस्थित होते.
यावेळी अजिंक्य बोरकर म्हणाले की, विकास कामांसाठी आ. संग्राम जगताप यांचे नेहमीच सहकार्य असते. विराज कॉलनीतील रस्ता काँक्रीटीकरणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून दिल्याने अन्य विकास कामे आता लवकरच सुरू होणार आहेत.


Post a Comment

0 Comments