Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपुर पांगुळ येथे स्व .आ. दगडू पाटील बडे युवा प्रतिष्ठानतर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- पाथर्डी तालुक्याने अनेक नामवंत खेळाडू घडविलेले आहे.क्रिडा क्षेत्रामध्ये,जिद्द व मेहनत या गुण अंगी बाळगले तर निश्चित यश मिळते.खेळाची आवड असणाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असते जेणेकरुन खेळात सातत्य राहण्यास मदत मिळते आणि सकारात्मकता वाढते व तरुनाणी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे असे मत भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनजय बडे यांनी व्यक्त केले.
चिंचपुर पांगुळ येथे स्व .आ. दगडू पाटील बडे युवा प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेप्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ राजेंद्र खेडकर हे होते.


स्व आमदार दगडू पा बडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक रू एकतीस हजार रुपये, व्दितीय एकवीस हजार रुपये, तृतीय अकरा हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आले आहे. आपणास आपल्या ध्येयाच्या जवळ जाण्यासाठी क्रिडा क्षेत्र हे मन,मेंदू आणि मनगट बळकट ठेवण्यास मोलाची मदत करते.स्पर्धांच्या माध्यमातून जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते तर आपल्या आवडत्या खेळाविषयी लहानपणापासूनच आवड आणि जिज्ञासा असली पाहिजे.पालकांनी सुद्धा पाल्याच्या आवडत्या क्षेत्रात करियर करुन देण्यास प्रोत्साहन द्यायला हव असे मत डॉ राजेंद्र खेडकर यांनी मांडले, तर सोशल मिडीयाच्या मायाजालात न अडकता मैदानावर या तरच शरीर चांगले ठेऊ शकू असे विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री घिगे सर यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी सोनाजी बडे, तुकाराम बडे,विष्णू खाडे, सोमनाथ वि बडे, शत्रुघ्न बडे, अमोल साळुंके , पोपट बडे, दगडू बडे, साईनाथ बडे, अश्रूबा बडे आदी पदाधिकारी व खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमराज दि.बडे यांनी केले. आभार प्रकाश बडे यांनी मानले.

संकलन-
पत्रकार सोमराज बडे -9372295757


Post a Comment

0 Comments