नगर रिपोर्टर
अहमदनगर - जय आनंद फाउंडेशन संचलित माहेश्वरी युवक मंडळाच्या अध्यक्षपदी विशाल झंवर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मंडळाच्या उपाध्यक्षपदी गणेश लड्डा, शामजी भुतडा तर सांस्कृतिक मंत्रीपदी उमेश झंवर यांची निवड झाली आहे.
या निवडीनंतर बोलताना झंवर म्हणाले की या पदाच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मदत मिळवून देणार आहोत. त्याचप्रमाणे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील; जेणेकरून फाउंडेशनच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली जाईल, असे ते म्हणाले. या निवडीबद्दल नवीन पदाधिकार्यांचे फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारख, कमलेश भंडारी, गोरख धनवडे, विशाल भराडीया, पवन बिहाणी, महावीर कटारीया आदिंनी अभिनंदन केले आहे.
0 Comments