Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रसंत गाडगेबाबांचे स्वच्छतेविषयीचे कार्य प्रेरणादायी : आ संग्राम जगताप

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : राष्ट्रसंत गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी गावोगावी जाऊन किर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी लोकप्रबोधन केले. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवल्यास आरोग्य निरोगी राहते. तसेच परिसर सुंदर दिसतो. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी मांडलेले स्वच्छतेविषयीचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांनी संत गाडगेबाबांच्या संकल्पनेतून स्वच्छतेचे महत्व ओळखुन शासनाच्या स्वतंत्र योजना राबविल्या. स्व आबांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान राबवित आहेत. ही बाब आथिमानास्पद आहे.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त येथील संत श्री गाडगे महाराज मराठा परिट समाज ट्रस्ट व श्री संत गाडगे महाराज मंदीर समिती आयोजित महाप्रसाद व महाआरती कार्यक्रम प्रसंगी आ. जगताप बोलत होते.
आ जगताप पुढे म्हणाले की, प्रत्येक समाजाने आपले समाज संघठन मजबूत करुन आप आपल्या समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम केले पाहीजे.
परिट समाजाच्या संगठनामुळे त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून सांस्कृतिक भवन व मंदीरासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. समाजाचे अन्य प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.


यावेळी दीपक आरडे म्हणाले की, संत श्री गाडगे महाराज मराठा समाज ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आ. संग्राम जगताप यांनी सांस्कृतिक भवनासाठी जागा उपलब्ध करुन दिली, त्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सारसनगर येथील राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या पुण्यतीथी सोहळ्यास राजेंद्र राऊत, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अंबादास सोनवणे, संतोष वाघ, महादेव कराळे, दादा पांडुळे, संजय आवारे, सुभाष भागवत, विनोद सोनवणे, अशोक ससाणे, शिवाजीराव तळेकर, मनोज शिरसाठे, दिलीप राऊत, सतिश कदम, दिपक आरडे, भाऊ दळवी, माऊली गायकवाड तसेच
केडगाव, नगर शहर, बुर्हाणनगर, भिंगार आदी भागातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments