Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागलवाडीच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केला रस्ता दुरुस्त

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 कर्जत- नागालवाडी ते बाभुळगाव तसा पूर्वीपासुनचा रहदारीचा रस्ता परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे, असे म्हणता येईल किंवा या तालुक्याचे असणारे पूर्वीचे लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यास गावातील तरुण कमी पडले असतील किंवा सरपंच, उपसरपंच कमी पडले असतील. ज्या कोणत्या कारणामुळे हा रोड दुर्लक्षित राहिला असेल तो राहिला असेल. परंतु इतके दिवस या रस्त्याने जाता येताना लोकांना इतक्या अडचणींचा सामना करावा लागत असताना देखील याकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही, हा मोठा प्रश्नच आहे ? पाऊसकाळात तर या रोडने गाडी चालवणे म्हणजे सर्कस मध्ये गाडी चालवने होय आणि पायी चालणे म्हणजे गुडघ्यापर्यंत पँट वरती करुन रस्त्यावरती दारं धरणे होय आणि याच दरम्यान कित्येक गाड्या गॅरेजला आणि कित्येक लोकं दवाखान्यात गेले असतील हे सांगणे जरा मुश्किलच आहे. याच काळात कोरोनाने हाहाकार माजवला असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला सुट्ट्या होत्या नाहीतर कित्येक विद्यार्थी हात पाय मोडुन घरी बसले असते. गावातल्या तरुणांनी वेळोवेळी सरपंच उपसरपंच यांच्याकडे रस्ता दुरुस्तीसाठी तक्रारी केल्या परंतु ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपत आला असल्याकारणाने म्हणा किंवा कोविड १९ चा प्रादुर्भाव असल्याकारणाने म्हणा या तरुणांच्या तक्रारीची कुणीही दखल घेतली नाही.तसा हा संपुर्ण पट्टा दुष्काळी भाग परंतु गेल्या दोन वर्षांपासुन वरुनराजाची चांगली क्रुपा झाल्यामुळे इथल्या लोकांनी ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु ज्यावेळी ऊस तोडायची वेळ आली. तेंव्हा रस्त्याची दुर्दशा पाहुन ऊसतोड मुकादम आणि ड्रायव्हर या भागात येण्यासाठी काटकसर करु लागले.आणि हीच गोष्ट गावातल्या तरुणांच्या लक्षात आली आणि त्यांनी ही गोष्ट मा ग्रा सदस्य धनंजय मते यांच्या कानावर घातली त्यांनी होकारार्थी मान हलवताच ॲड राहुल मते यांनी प्रत्येकी 500 रुपये बापुराव गरसुळे यांच्याकडे जमा करावे, असा मॅसेज गावातल्या ग्रुपवरती टाकला आणि गरसुळे यांनी जिथे भेट होईल तिथे ती रक्कम जमा करुन घेतली दोनच दिवसात सर्व रक्कम जमा होऊन शेतकऱ्यांनीं स्वखर्चाने तब्बल चार कि.मी रस्ता मुरुम टाकून दुरुस्त केला. दुसऱ्याच दिवशी ऊसतोडणीसाठी दोन टोळ्या या गावात आल्या. येणाऱ्या पुढील काळात नागलवाडीत येणाऱ्या सर्व रस्त्याने विद्यमान लोकप्रतिनिधींना फिरऊन त्यांचे लक्ष याकडे वेधुन रस्ते मंजूरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे गावचे तरुण ॲड राहुल मते यांनी सांगितले.
संकलन : तुषार हजारे 

Post a Comment

0 Comments