Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे खून प्रकरणीत निष्पन्न झालेले बाळ ज बोठे याच्या नावाची लुकआऊट नोटीस जारी !

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- रेखा जरे खून प्रकरणीत निष्पन्न झालेले नावाचे बाळ ज बोठे याच्या नावाची लुक आऊट नोटीस जारी झाली असून, याबाबत विमान प्राधिकरणास जिल्हा पोलिस प्रशासनाने पञ देण्यात आले असल्याची माहिती समजते.




रेखा जरे खून प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने सर्व आरोपींना दि.7 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या जरे खून प्रकरणात पत्रकार बाळासाहेब बोठे याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तेव्हा पासून बोठे हे फार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या धर्तीवर पोलिस प्रशासनाने बाळ ज बोठे याच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने देशातील विमान प्राधिकरण यांना पञ दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
रेखा जरे खून प्रकरणी यापूर्वीच फिरोज राजू शेख (वय 26 रा. संक्रापूर आंबी ता. राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24 रा. कडीत फत्तेबाद ता. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25 रा. तिसगाव फाटा कोल्हार ता. राहता), सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा. शास्त्रीनगर केडगाव अहमदनगर), ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23, रा. प्रवरानगर ता. राहाता) आदी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments