Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरला शनिवारी ओबीसी, व्ही.जे.,एन.टी जनमोर्चाचा जिल्हा मेळावा ; मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- ओबीसी, व्ही.जे.,एन.टीसह अन्य उपेक्षित समाजाचा जनमोर्चाचा शनिवारी (दि. 26) राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर येथील टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्हा मेळावा आयोजित केला आहे. या जनमोर्चाच्या मेळाव्यास ओबीसी,व्ही.जे.,एनटीसह उपेक्षित समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जनमोर्चाच्या प्रतिनिधींनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकार मिळवण्यासाठी राज्यातील ओबीसीसह उपेक्षित समाज संघटित करण्याचा निर्धार करून ओबीसीचे आरक्षण वाचवणे आणि विविध समाजाच्या प्रलंबित ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी, व्ही.जे.,एन.टी जनमोर्चाची निर्मिती झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी संजय जाधव, रमेश सानप, हाजी शौकतभाई तांबोळी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक सोनवणे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शशिकांत पवार, बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर गायकवाड आदींची ओबीसी घटकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकारी दरबारी ओबीसी आरक्षणात कोणाचाही समावेश नको. नोकरी भरती तात्काळ सुरू करण्यात यावा. एमपीएसीसी परीक्षा तात्काळ सुरू करण्यात याव्यात. शिक्षक नोकर भरती कपात न करता करण्यात यावी. महा ज्योतीला शंभर कोटी निधी मिळावा. जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. बारा बलुतेदारांना आर्थिक विकास महामंडळ जाहीर करण्यात यावे. या महामंडळास 500 कोटींचा निधी मिळावा.एससी-एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. धनगर समाजाचे विविध मंजूर योजना शंभर कोटी निधी उपलब्ध करून योजना त्वरित सुरू कराव्यात. ओबीसी मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी ओबीसी कोट्यामध्ये विशिष्ट प्रवर्ग तयार करून चार टक्के कोटा देण्यात यावा आणि मुस्लिम समाजातील पोटजातीचा जनगणनेत स्पष्ट उल्लेख करावा आदी मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments