Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वैद्यनाथ साखर कारखान्यातील ३७ लाखाच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी वैजनाथ :- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील वर्क शॉप स्टोअर गोडाऊनमधील कारखान्याच्या कामाचे साहित्य तसेच संगणक चोरी प्रकरणात आज परळी ग्रामिण पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याचे लिगल इन्चार्ज खदीर जमिल शेख यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परळी ग्रामिण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत वर्क शॉप स्टोअर गोडाऊनच्या पाठीमागील लोखंडी शटर रॉडने वर उचलून गोडाऊनमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. या गोडाऊनमधील कारखान्याच्या कामाचे साहित्यासह संगणक व अन्य तांत्रिक साहित्य चोरट्यांनी चोरले आहे. या एकुण साहित्याची किंमत ३७ लाख ८४ हजार ९१४ रुपये एवढी असल्याचे तक्रारीत खदीर जमिल शेख यांनी म्हटले आहे. या संदर्भात पोलीसांनी ४६१, ३८० भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पो.नि. शिवलाल पुर्भे हे करीत आहेत.

संकलन : महादेव गिते 

Post a Comment

0 Comments