Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हेळंब येथील श्री खंडोबा यात्रेत सोशल डिस्टनसींगचे पालन करत भाविकांनी घेतले दर्शनखंडोबा यात्रेनिमित्त पाच 
मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा सपंन्न
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी वैजनाथ :- तालुक्यातील हेळंब येथे श्री. खंडोबा यात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करत तसेच मास्क व सेनिटायझरचा वापर करत भाविकांनी दर्शन घेतले. 
हेळंब येथे दरवर्षी चंपाषष्टी निमीत्त मोठी यात्रा भरते यानिमीत्त तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात यावर्षी ही यात्रा दि.20 डिसेंबर पासून सुरुवात होत असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेनिमित्त आयोजीत करण्यात येत असलेले व्यापक कार्यक्रम रद्द करण्यात आले असुन पाच मानकर्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा हेळंब ग्रामस्थांनी घेतला होता तो पुर्ण करण्यात आला.
हेळंब येथुन जवळच असलेल्या बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. स्वतः खंडोबा हे हेळंब येथे वास्तव्याला होते. त्याचा पुरावा म्हणुन स्नान साठी वापरण्यात येते असलेल्या तीर्थ कुंड आजही उपलब्ध आहे. घोडा बांधन्यासाठी खुट उपलब्ध आहे. व त्याच्या खुना आजतागयत आहेत. श्री खंडोबा मंदिराची दुर दुर ख्याती आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला इथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शन घेतात.यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा व अनेकप्रकारची दुकाने येतात यावर्षी कोरोनामुळे यात्रेतील कार्यक्रम रद्द करावेत अशा सुचना प्रशासनाने दिल्यानंतर हेळंब ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेत फक्त पालखी सोहळा पाच मानकर्यांच्या उपस्थितीत घेण्याचे व खंडोबाचे दर्शन सर्व नियम पाळून करण्याचा निर्णय घेतल्याने येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात व भाविकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसींग नियमांचे अंमलबजावणी करत श्री खंडोबाच्या पालखीवर भंडारा खोबर्याची उधळण करीत अगदी पाच मानकऱ्यांच्या उपस्थित गावातून खंडोबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात आली. तसेच भाविकांनी रांगेमध्ये मनोभावे दर्शन घेतले. आज दर्शनाचा लाभ मिळाल्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलला होता. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामिण पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संकलन : महादेव गितेPost a Comment

0 Comments