Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी ; राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिपक कावळे पा. यांची मागणीऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिपक कावळे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. कावळे पा.यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस भरती, बँक भरती, MPSC - UPSC च्या सर्वच्या सर्व प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे. ती लवकरात लवकर सुरू करावी , कारण लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची अभ्यास आणि तयारी करत आहेत. घरापासून शहराच्या ठिकाणी बाहेर राहायचं म्हणजे महिन्याला 6-7 हजार रुपये खर्च येतो आणि सर्वांचीच परिस्थिती बेताची असते असे नाहीये सर्व विद्यार्थ्यांचे पालक शेती. ऊसतोडणी करून काटकसर करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत असतात. काही विद्यार्थी स्वतः काम करून अभ्यास करत आहेत परंतु परीक्षेची अनिच्चीतता आहे त्या कारणाने अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा देखील संपली आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षांचे ऑनलाइन फॉर्म देखील भरून घेतले आहेत त्याच देखील पुढे काहीच झालेलं नाही. त्यामुळे सरकार ने आरक्षणाचा विषय मार्गी लावून सर्व विध्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि पोलिस भरती, MPSC परीक्षांच्या प्रक्रिया व तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात.
Post a Comment

0 Comments