Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्व. मुंडेंची जयंती ऊसतोडणी कामगार कल्याण दिन म्हणून साजरी करा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कामगारासाठी स्व. गोपीनाथ मुंडे दैवत असून, कामगारांच्या सर्वागिण कल्याणासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांची जयंती (१२ डिसेंबर) ऊसतोडणी कामगार कल्याण दिन म्हणून राज्य शासनाने साजरी करावी अशी मागणी प्रा.सुनिल पाखरे व नागनाथ गर्जे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, उसाच्या फडात घाम गाळणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या व्यथा व वेदना पाहुन मुंडेंनी तोडणी कामगारांचे पालकत्व स्वीकारले. सत्तेपेक्षाही कामगारांच्या हिताला प्राधान्य देत त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून राज्यापुढे कामगारांचे प्रश्न मांडून त्यासाठी वेळोवेळी संघर्ष केला. कामगारविरोधी धोरणाला सतत तीव्र विरोध करत साखर कारखानदारांना कामगार हिताचे धोरण अंमलात आणण्यास साखर संघामार्फत भाग पाडले. राज्यातील तोडणी कामगार वर्षातून एक दिवस तरी गोपीनाथगडावर येऊन तेथे एकत्रितपणे विचारांचे आदान-प्रदान होऊन समस्या, मागण्या व अडचणींबाबत संघटनात्मक पातळीवर भूमिका ठरवली जाईल. मुंडे यांच्याप्रती आदरभाव व तोडणी कामगारांच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता त्यांच्या जयंतीचा जयंतीचा दिवस त्यांच्या नावाने तोडणी कामगार कल्याण दिन म्हणून साजरा करून शासनाने त्यांच्या कार्याचे कायमस्वरूपी स्मरण ठेवावे. राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांचे प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जाऊन सर्व कामगारांना न्याय मिळण्यास अशा उपक्रमांनी सहाय्य होणारआहे, असे प्रा. सुनील पाखरे  म्हणाले.Post a Comment

0 Comments