Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या वाव-याने भारनियमनात बदल
सकाळी 6 ते 12 या वेळेत चिंचपुर पांगुळ,वडगांव, पिपळगाव टप्पा, तीनखडी तर दुपारी 12 ते 6 करोडी, कुत्तरवाडी,चिंचपुर ई.,टाकळी मानूर,चुभळी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी- तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाव-याने वातावरण भयभीत झाले आहे. यामुळे शेतक-यांना दिवसा पिकास पाणी देता यावा, यासाठी दिवस व राञीच्या भारनियमनात बदला करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होती. या मागणी दखल घेतली आहे. यात शेतीस पाणी देण्यासाठी सकाळी 6 ते 12 या वेळेत चिंचपुर पांगुळ,वडगांव, पिपळगाव टप्पा, तीनखडी तर दुपारी 12 ते 6 करोडी, कुत्तरवाडी,चिंचपुर ई.,टाकळी मानूर,चुभळी आदि गावासाठी विज असणार असल्याचे सहायक कार्यकारी अभियंता पोपळघट व उप कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले. 


वडगांव, पिपळगाव गाव टप्पा, टाकळी मानूर,चिंचपुर पांगुळ व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने अनेकांना दर्शन देत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला असल्याने शेतातील काम करणं कठीण झाले आहे, त्यातच वीज महामंडळाचा लोडशेडिंगचा फटका शेतकऱ्यांना बसत होता, कारण विजेची उच्च दाबाने शेतीसाठी वेळ ही रात्रीची असल्याकारणाने बिबट्याचा हल्ला करण्याचा घटनाने शेतकऱ्यांना पिकास पाणी पुरवठा करणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पिके वाळून चालले होते त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आणखी एक समस्या निर्माण झाली होती, शेतकऱ्याची हीच अडचण लक्ष्यात घेऊन, शेतीसाठी विजेचा टाइम हा दिवसा करावा अशी मागणी भाजप नेते जिल्हा उपाध्यक्ष सरपंच धनंजय बडे यांनी मागील आठ दिवसापासून वीज वितरण कंपनीचे अधिकारी पोपळघट (सहायक अभियंता पाथर्डी) यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत संबंधित वीज वितरण कंपनी ने बिबट्याच्या वावर संबंधित गावातील व परिसरातील गावात वीज दिवसा ठेवण्यात येऊन विजेच्या वेळापत्रकात बदल घडवून आणला आहे. यामुळे परिसरातील शेतक-यांनी आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

संकलन - सोमराज बडे 
मो -9372295757

Post a Comment

0 Comments