Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्याविहार सोसायटी येथील श्री दत्तजयंती सोहळा रद्द

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - अहमदनगर शहरातील दिल्लीगेट परिसरात असलेल्या विद्याविहार सोसायटी येथली श्री दत्तजयंती सोहळा रद्द करण्यात आला आहे.यंदा करोना मुळे हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करणार अशी माहिती राजेंद्र येंडे परिवाराच्या वतीने देण्यात आली. 
विद्याविहार सोसायटी मध्ये असलेल्या श्री दत्त मंदिरात गेल्या १५ वर्षापासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करुन महाभंडारा करण्यात येतो.
मात्र यंदा कोरोना मुळे विद्याविहार सोसायटी चे पदाधिकारी आणि राजेंद्र येंडे परिवाराच्या वतीने भाविकांच्या आरोग्यासाठी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. 
या सोहळ्या मध्ये फक्त श्री दत्तात्रयांना अभिषेक आणि दत्त जन्म होणार आहे. या निमित्ताने होणारा महाप्रसाद भंडारा होणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी. 
भाविक श्री दत्तात्रयांच्या दर्शनाला येऊन प्रसादाचा लाभ घेऊ शकतात, मात्र यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये असे आवाहन राजेंद्र येंडे आणि विशाल येंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments