Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुथ हॉस्पीटलची कोरोना काळातील रुग्णसेवा सदैव स्मरणात राहील : नगरसेवक गणेश भोसले
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : समाजावर ज्या ज्या वेळी महामारीची संकटे आली त्या त्या वेळी रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या बुथ हॉस्पिटलने रुग्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदानाचे महान कार्य केले आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणू काळात बुथ हॉस्पीटलने केलेली रुग्णसेवा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीली जाऊन सदैव स्मरणात राहिल असे गौरवोदगार नगरसेवक गणेश भोसले यांनी काढले.
स्व. सौ. अनिता संतोष पोखरणा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  पोखरणा कुटुंबियांच्यावतीने बुथ हॉस्पिटलला पाच रुग्ण खाटा भेट म्हणून देण्यात आल्या, त्यावेळी श्री भोसले बोलत होते.यावेळी संतोष पोखरणा म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात सर्वजण भयभीत झाले होते. सुरुवातीच्या काळात कोरोना बाधीत रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईक देखील घाबरत होते. अशा वेळी बुथ हॉस्पिटलने रुग्णांकडून कोणतेही शुल्क न घेता रुग्णसेवा दिली, ही बाब सदैव स्मरणात राहील. याच प्रेरणेतुन पत्नी स्व अनिता पोखरणा हिच्या स्मरणार्थ आज पाच रुग्ण खाटा बुथ हॉस्पिटलला भेट देत आहोत, असे संतोष पोखरणा यावेळी म्हणाले.
 यावेळी बुथ हॉसिटलचे संचालक डॉ. देवदान कळकुंबे, शुभम पोखरणा, ईश्वर पोखरणा, प्रकाश पोखरणा, डॉ. सचिन भंडारी, कुशल गुंदेचा, संगिता गांधी, विनोद पोखरणा, रतिलाल गांधी, प्रदीप गांधी, विनीता गुंदेचा, प्रितम गुंदेचा, जावेद शेख, राजू आंबेकर आदी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments