Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांची श्री साई मंदिरास भेट!

 


कोरोनाचा नायनाट होण्याचे साईचरणी साकडे!
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
शिर्डी -ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांनी आज येथील श्री साई मंदिरास भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. 
त्यावेळी त्यांनी संपूर्ण जगातून कोणाचा नायनाट व्हावा असे श्री साई चरणी साकडे घातले, याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते. जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊन सर्वांना गतवैभव व जीवन प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना श्री साईबाबांच्या चरणी केल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या दिशा निर्देशांचे भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. तसेच श्री साई संस्थान मंदिर व परिसरात सभ्य गणवेश घालून साईभक्तांनी यावे असे आवाहान केले ते योग्यच आहे संस्थांननी कोणत्याही ड्रेस कोड किंवा सक्ती केलेली नाही ,मात्र येथे पावित्र्य जपण्यासाठी हा योग्य निर्णय असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

,

Post a Comment

0 Comments