Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मांज्यावर तातडीने बंदी घालावी ; अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- पर्यावरणाला हानिकारक व अनेकांचा बळी घेणारा पतंग उडविताना वापरण्यात येणारा मांज्या दोर्‍यावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अनेक पशुपक्ष्यांचा व माणसांना या मांज्या दोऱ्यामुळे जीव गमवावा लागला आहे. काही दिवसापूर्वी नगर-औरंगाबाद महामार्गावर एका वाहन चालकाचा मांज्या दौऱ्यामुळे गळा कापण्याची घटना घडली. या घटनेतील जखमीवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मांज्या दो-यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात जहागिरदार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments