Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची जबाबदारी 'मी' सामाजिक न्याय विभागाकडे मागून घेतली : धनंजय मुंडे

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - माझ्या वडीलांनी स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी ऊस तोडलेला आहे.यामुळे मला ऊसतोड कामगारांच्या समस्या, अडचणींची चांगलीच जाणीव आहे. त्यामुळेच ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची जबाबदारी 'मी' सामाजिक न्याय विभागाकडे मागून घेतली आहे. ऊसतोड कामगारांना सामाजिक न्याय विभागाकडून विशेष सहाय्य मिळवून देणार आहे, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे यांनी दिली.
माथाडी कामगार कायद्याप्रमाणे ऊसतोड कामगारांसाठी येत्या अधिवेशनात कायदा अस्तित्वात आणणार असल्याची घोषणाही यावेळी धनंजय मुंडेंनी केली आहे.
ऊसतोड कामगार नोंदणी, आरोग्य विमा संरक्षण या बाबी येत्या काही दिवसांत पूर्ण करून, ऊसतोड कामगार कायदा येत्या अधिवेशनात अस्तित्वात आणू, अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी केली.


Post a Comment

0 Comments