Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रस्ता लुटीतील आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाईऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
जामखेड-जामखेड पोलिस ठाण्यात चोरीलूट प्रकरणी दि. 10 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलाला माल हा प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे याच्याकडे असल्याने त्याला उस्मानाबाद जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अहमदनगर एलसीबी पथकाने केली. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, खर्डा ते जामखेड रस्त्याने दुचाकीवर येत असताना पाठीमागून येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला. या दरम्यान दुचाकीला चोरट्यांनी त्यांची दुचाकी आडवी लावली. फिर्यादी व पतीस यांना ढकलून देऊन चाकूचा धाक दाखवून गळ्यातील कानातील दागिने, मोबाइल व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी झुलेखा चंदुलाल पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात लूट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या दाखल गुन्ह्यातील
आरोपी प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे (रा. पिंपळगाव फाटा ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांच्याकडे असल्याची माहिती पो. नि. अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार श्री कटके यांनी त्यांच्या पथकाला त्यांनी दिल्या. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन आरोपी प्रकाश शिंदे याचा शोध घेऊन त्याला मुद्दामालासह ताब्यात घेतले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनील कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकाॅ विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, रणजित जाधव, रोहिदास नवगिरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, चापोना कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.Post a Comment

0 Comments