Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना पाच दिवस कोठडी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तिघा आरोपींना पारनेर न्यायालयाने दि. ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत दिली आहे. आरोपी शनेश्वर उर्फ गुड्डू शिंदे (कोल्हार), फिरोज शेख (श्रीरामपूर), आदित्य चोळके (राहुरी) अशी नावे आहेत.
पोलिसांनी मंगळवारी विविध ठिकाणाहून तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांना बुधवारी दुपारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मनिषा डुबे यांनी आरोपींच्या दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.  न्यायालयाने तिघांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
 सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे़. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेक-यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलिस पथके रवाना करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments