ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- ओंकार बाबासाहेब भालसिंग यास जबर मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणात आरोपी इंद्रजित रमेश कासार याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील वाळकी येथे विश्वजीत प्रतिष्ठानच्यावतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्यावेळी विरोध केल्याचा राग मनात धरुन 17 नोव्हेंबर रोजी विश्वजीत कासार व त्याच्या इतर साथीदारांनी ओंकार बाबासाहेब भालसिंग याला जबर मारहाण केली होती. जखमी भालसिंग याच्यावर पुणे येथे उपचार चालू असताना दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नगर तालुका पोलिस ठाण्यात कासार व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने पो. नि. अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपी कासार याला वाळकी येथे शिताफीने पकडले.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पो. ना सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश वाघ, विजय धनेधर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
0 Comments