Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ॲड. संतोष गायकवाड यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- आपला देश हा लोकशाही राष्ट्र असून लोकशाही मूल्यांचे रक्षण व संवर्धन होणे कामीची सर्व व्यवस्था भारतीय राज्यघटनेद्वारे केली गेलेली आहे. असे असूनही मागील काही काळात लोकशाहीची हत्या होताना दिसून येत होती. सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोठ्या उत्साहात उत्सव स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करून तेथे बिनविरोध सरपंच पदासाठी लिलाव घेण्यात आल्याच्या अनेक घटना घडताना दिसून आल्या. यावर मानवाधिकार अभियान, महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्याबाबतची रीतसर तक्रार मा. निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडे दि. 29/12/2020 रोजी दाखल केली आहे. मा. निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना "बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे अहवाल सादर करावे" असे पत्र पाठविले आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या सदर प्रकरणांची गंभीर दखल घेत असल्याचे मा. सचिव, निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी दि. 30/12/2020 रोजी ॲड. संतोष गायकवाड यांना ई-मेलद्वारे कळविले आहे.

सरपंच पदाच्या लीलावासारख्या घटना घडत असताना त्याचा निषेध करणे सोडून अनेक गावकरी त्यात सहभागी होऊन जल्लोश करताना दिसून येत होते. ही बाब लोकशाहीसाठी नक्कीच धोकादायक ठरणारी व राष्ट्राला हळूहळू हुकूमशाही, भांडवलशाही कडे घेऊन जाणारी आहे. याबाबीकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अनर्थ होऊन उपेक्षित व वंचित घटकांना कधीही निवडणूक लढवता आली नसती, किंबहुना ज्या गावांमध्ये सरपंच पद विकले गेले त्या गावांतील होतकरू, सुशिक्षित परंतु धनाढ्य नसणाऱ्या युवक/युवतीला ईच्छा असूनही निवडणूक लढवता आली नाही. आणि हे असेच चालू राहिले तर लोकशाही मृत झाल्याशिवाय राहणार नाही ही बाब ॲड. संतोष गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच याबाबत मा. निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करत संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर आयोगाने देखील गंभीर दखल घेतली असून त्याबाबत समाजाच्या विविध स्तरांतून ॲड. संतोष गायकवाड यांच्या भूमिकेचे स्वागत होत असून त्यांनी घेतलेल्या अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ॲड. संतोष गायकवाड यांचा लोकशाही तत्वे रुजविणे व टिकविण्यासाठीचा लढा असाच चालू राहो अशी सदिच्छा देण्यात येत आहे.Post a Comment

0 Comments