Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पिपळगाव टप्पा येथे बिबट्याचा हल्ल्यात म्हैस ठार

  


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - तालुक्यातील पिपळगाव टप्पा येथे काल रात्री 9 वा. सटाई मध्ये लताबाई महादेव शिरसाठ यांची म्हैस बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. 
समजलेली माहिती अशी की, गुरांच्या गोठयात जनावरे बांधलेली होती. यावेळी बिबट्याने शेजरील ऊसाच्या शेतातून येऊन शिरसाट यांच्या म्हशींवर हल्ला केला यात म्हैस जागीच ठार झाली आहे,गुरांच्या ओरडण्याने घरातून बाहेर येऊन पाहिलं असता बिबट्याने धूम ठोकली. या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सदर घटनेचा पंचनामा वणाधिकाऱ्यांनी केला आहे. सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे लोक भयभीत झाले आहेत,कारण मागील काही दिवसांपासून चिंचपुर पांगुळ, वडगांव, जाटवड, आदी गावात बिबट्याने ठाण मांडून बसला आहे. यात बिबट्याची संख्या नेमकी किती आहे याची माहिती हा प्रश्न उपस्थित होत आहे.


वनविभागाने त्वरित याची दखल घेत सापळा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
संकलन-
पत्रकार सोमराज बडे मो.९३७२२९५७५७Post a Comment

0 Comments