Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महा आवास योजनेतील घरकुल कामांना गती द्या - विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातील महा आवास योजनेतील घरकुल कामांना गती द्या. ज्या अडचणी असतील त्या तात्काळ सोडवून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
श्री. गमे यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन तेथील कामाची तपासणी करुन अधिकार्‍यांकडून कामाकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी - विभाग प्रमुख उपस्थित होते.
या वेळी विभागीय आयुक्त गमे यांनी विभागनिहाय सर्व विषयांचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य आदी बाबीत जिल्हा परिषदेने केलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या राज्य शासनाने विविध घरकुल योजना एकत्रित करून महा आवास योजना - ग्रामीण राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी गतीने व्हावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महाआवास योजनेत जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना आणि पारधी घरकुल योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना आदींचा आढावा त्यांनी घेतला. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. घरकुल मंजुरीनंतर पहिला हफ्ता वेळेवर दिला गेला पाहिजे. जागेअभावी घरकुलाचे काम रखडणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेत ज्या ठिकाणी 50 हजारांत घरकुलासाठी जागा मिळणार नाही, त्या ठिकाणी जादा लाभार्थी यांना एकत्र करून घरकुल उभारण्याच्या सुचना आयुक्त गमे यांनी दिल्या. 
ग्रामपंचायत पातळीवर होणार्‍या अपहारांची रक्कम भरून घेण्यासोबत ग्रामपंचायतींना देण्यात येणार्‍या कर्जाची नियमित वसुलिकडेही लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. 


Post a Comment

0 Comments