Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस अधिकारी, कर्मचारी जीन्स पॅन्ट, टी शर्ट परिधान करणे, कार्यालयाच्या दृष्टीने योग्य नाही

 ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नांदेड|- शासकीय कार्यालयांमध्ये चित्र-विचित्र पेहराव परिधान करण्यावर शासनाने बंदी घातल्याचे आदेश नुकतेच जारी केले. पण पोलीस विभागासाठी हे बंधन सन 2019 पासून कायम करण्यात आलेले आहे. तो आदेश नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरतीसिंह यांचा असला तरी त्याच पध्दतीवर राज्यभरातील पोलीस विभागात काम व्हावे, असे अपेक्षित आहे.
राज्य शासनाने कांही दिवसांपूर्वीच संकेतांक क्रमांक 202012111114476107 यानुसार शासकीय कार्यालयांमध्ये येतांना कोणत्या प्रकारचा पेहराव अधिकारी व कर्मचाऱ्यांचा असावा याचे विस्तृत वर्णन करणारा शासन निर्णय जारी केला. आता तो शासन निर्णय कधी प्रत्येक शासकीय कार्यालयात येईल, त्याचा अमल करण्यासाठी आदेश होती आणि त्या आदेशाचे पालन त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी करतील याचे कांही एक गणिक आज सुनिश्चित नाही.
पण येणाऱ्या भविष्याला ओळखण्याची ताकत कांही लोकांची असते. असे व्यक्ती पुढे येणाऱ्या घटनांचा विचार आजच करून त्यावर आपली कार्यपध्दती निश्चित करतात. असेच एक व्यक्तीमत्व मार्च 2019 मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक या पदावर कार्यरत होते. त्या आरतीसिंह आज अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्या आदेशानुसार दि.21 मार्च 2019 रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे मुख्यालय पोलीस उपअधिक्षक सुरेश जाधव यांनी काढलेले कार्यालयीन आदेश असे आहेत की, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांच्या निदर्शनास असे आले आहे की, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सर्व पोलीस ठाणे, पोलीस अधिक्षक कार्यालय येथे येतांना कांही पोलीस अधिकारी व कर्मचारी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट परिधान करून येतात. हे कार्यालयाच्या दृष्टीने योग्य नाही.
तेंव्हा यापुढे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे, पोलीस उपअधिक्षक कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय येथे येतांना गणवेशाची गरज नसेल तर जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट परिधान करून येणार नाहीत. त्यांनी फॉर्मल ड्रेस परिधान करून कार्यालयात यावे असे या कार्यालयीन आदेशात लिहिलेले आहे. जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट परिधान करून आलेच तर योग्य कार्यवाही केली जाईल याची समज देण्यात आली आहे. राज्य शासनाने आता असे चित्र-विचित्र परिधान करण्यावर बंदीच घातली आहे. पण सध्याच्या अमरावती पोलीस आयुक्त आणि माजी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरतीसिंह यांनी या बाबीला तेंव्हाच ओळखले होते आणि मार्च 2019 मध्येच आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जीन्स पॅन्ट व टी शर्ट परिधान न करण्याचे आदेश दिले होते.


Post a Comment

0 Comments