Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे खून प्रकरण ; प्रकरणाची मीडिया ट्रायल होऊ नये - जिल्हा व सत्र न्यायाधीश एम आर नातू

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- रेखा जरे यांच्या खून प्रकरणाची मीडिया ट्रायल होऊ नये. या घटनेमध्ये आपण थिल्लारपणा सहन करणार नाही. प्रसारमाध्यमांनी संयमाने वार्तांकन करावे तसेच, सुनावणीदरम्यान किंवा पोलिस तपासात माध्यमांकडून वार्तांकन करताना संयम सुटल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम आर नातू यांनी दिला असल्याची माहिती बोठे यांचे वकील महेश तवले यांनी दिली.
रेखा जरी खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता, त्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.11) सुनावणी होणार होती. पण तपासी अधिकारी पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांचे म्हणणे दुपारपर्यंत सादर झाले नव्हते. तत्पूर्वी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील न्यायालयात हजर झाले, यावेळी त्यांनी सुनावणी सोमवारी (दि.14) ठेवण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केले, यावेळी बोठे याचे वकील हजर होते. जिल्हा न्यायाधीश एम आर नातू यांनी या रेखा जरे खून प्रकरणी होत असलेल्या वार्तांकनाबाबत नाराजी व्यक्त केली. विश्वासार्हता राहिल या पद्धतीने वार्तांकन करावे. या घटनेत थिल्लरपणा खपून घेणार नाही. या घटनेच्या सुनावणीदरम्यान किंवा पोलीस तपासादरम्यान माध्यमांकडून वार्तांकन चुकीचे झाल्याचे आढळून आल्यास कारवाई करू असे जिल्हा न्यायाधीश नातू म्हणाले. 
तसेच मुख्य संशयित बोठे यांचे वकील महेश तवले यांनी समाज माध्यमांवर काही समाजसेवक या रेखा जरे खून प्रकरणाविषयी चुकीची पोस्ट शेअर करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्या पोस्टची प्रिंट तात्काळ जमा करा, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments