ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : येथील कार्मी सिस्टीम्स् या सॉफ्टवेअर कंपनीने हॉस्पिटल व दवाखाने यांना दैनंदीन कामकाजात उपयुक्त ठरणारे क्लाऊड बेस "ईपीऑन" सॉफ्टवेअर जानेवारी मध्ये लॉन्च केले होते. उच्च व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रीम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) आणि माहीती विश्लेषण (DATA Analytics) इ चा वापर करुन बनवलेली ही सॉफ्टवेअर प्रणाली हॉस्पिटल व दवाखान्यांना दैनंदीन कामकाजात अतिशय उपयुक्त ठरत असल्याने ८ ते ९ महिन्यांच्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात यास नगर, पुणे, मुंबई तसेच हरियाणा राज्यात व ओमान देशातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहीती निनाद व दिप्ती शिंदे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण होता. या काळात इपीऑन सॉफ्टवेअरमुळे हॉस्पिटल व दवखान्यांमधील पेशंट केअर, मेडीकल डेटाची देवाणघेवाण आणि प्रशासकीय प्रक्रीयेचे योग्य रित्या विश्लेषण करून जतन करून ठेवता येतो. त्यामुळे वेळेची बचत होऊन डॉक्टरांना पेशंटकडे जास्त वेळ देता येतो, अशा प्रतिक्रीया प्राप्त झाल्या आहेत.
कार्मी सिस्टिम्सचा मुंबई येथील हेल्थकेअर सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टर्झ कंपनीशी भागीदारी करार झाला असून डॉक्टर्झ भारतातील ७५० हॉस्पिटल्सना सेवा देत आहे.
अहमदनगर शहरात सॉफ्टवेअर उद्योगाला चालना मिळावी, नगरमधील तरुणांना यात संधी मिळावी यासाठी २०१६ साली कार्मी सिस्टीमची स्थापना करण्यात आली. यशस्वी वाटचालीमुळे कंपनीला आयएसओ मानांकन मिळाले आहे,अशी माहीती निनाद शिंदे व दिप्ती शिंदे यांनी दिली. त्यांच्या टीममध्ये मंदार शिंदे, अरूण दारूणकर, प्रमोद मंचरे, सुरेश कोष्टी, संदीप खैरे यांचा सहभाग आहे.
0 Comments